आग्रा – ताजमहाल वास्तुच्या चार मिनारांपैकी मागच्या बाजूच्या एका मिनारची काही प्रमाणात पडझड झाल्यानंतर काहीं दिवसांपुर्वी त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असून हे काम येत्या 15 सप्टेंबर पुर्वी म्हणजेच जागतिक पर्यटक दिनाच्या पुर्वी पुर्ण होईल अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन आहे. पुरातत्व विभागाचे सहायक कॉन्झरव्हेशन आधिकारी अमरनाथ गुप्ता हे या कामावर देखरेख करीत आहेत. ते म्हणाले की हे काम परफेक्ट पद्धतीने करावे लागेल पण आम्हीं ते वेगाने करीत आहोत. मिनारचे काही दगड बदलावे लागणार आहेत. हे करताना मूळ मिनारला कोणताही धक्का बसणार नाही हेही पहावे लागेल.
ही वास्तु सतराव्या शतकातील आहे. मिनार दुरूस्तीचे हे काम नेहमीच्या स्वरूपातील नाहीं. ते विशेष कौशल्याने करावे लागत आहे. ताजमहालाच्या शेजारी असलेल्या यमुना नदीचे पात्र आटले असून त्यातील ग्रीन बॅक्टेरीचाहीं या वास्तुला मोठा धोका आहे. वास्तुची मागील बाजू या पात्रालगत आहे. त्या बाजुला ताजमहालच्या भींतींवर हिरव्या रंगाचे काही थर लागले आहेत. त्याचाहीं बंदोबस्त केला जात आहे.