परस्परविरोधी तक्रार दौंड पोलीस ठाण्यात दाखल
दौंड- कुरकुंभ (ता. दौंड) येथील मुख्य चौकात शुक्रवारी (दि. 17) झालेल्या दगडफेकीच्या घटनेप्रकरणी शनिवारी (दि. 18) दौंड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून दोन्ही बाजुच्या एकूण 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रफिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादिवरून मनोज नरळे, प्रमोद रजपूत, सोन्या पालीम, श्रीकांत कांबळे, अतुल सिद्धगणेश, कन्हैयालाल वाल्मीकी, जब्बार जाधव, श्रीकांत थोरात, सोहम शिंदे, कृष्णा पिल्ले, अशोक सोनवणे, जितू शिंदवणे, अमोल संवसाले, प्रसाद सवाणे, सनी उबाळे, सागर, बल्ली (याचे पूर्ण नाव माहीत नाही) आणि इतर 10 ते 15 अज्ञात (सर्व रा. दौंड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आशा दत्तात्रय परब (वय 50, रा. दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादिवरून राहुल हनुमंत भोसले, प्रमोद हनुमंत भोसले, चंद्रकांत नाना भागवत (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), सनी सोनार, आयुब उर्फ गोट्या शेख, अझर शेख, रफिक शेख, जावेद शेख (सर्व रा. कुरकुंभ, ता. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेलेली माहिती अशी की, फिर्यादी रफिक शेख, आयुब शेख, संतोष सोनार, जाकीर शेख, सचिन साळुंखे, उमेश सोनवणे, रशीद मुलाणी, नवनाथ साळुंखे, दत्ता गिरमे हे कुरकुंभ येथील मुख्य चौकातील पुलालगत दुपारी चारच्या सुमारास उभे असताना 15 ते 20 दुचाकीवर 30 ते 40 जण कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले आणि उपसरपंच नाना भागवत कोठे आहेत? कुरकुंभकारांना जिवंत सोडणार नाही, पोलीस पण आमचे काही वाकडे करणार नाही असे म्हणत संतोष सोनार यांना दगडाने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रफिक शेख तसेच आयुब शेख, सचिन साळुंखे, उमेश सोनवणे, जाकीर शेख, रशीद मुलाणी हे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण झाली. यावेळी संतोष सोनार यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्यानंतर कुरकुंभ येथील व्यावसायिक दुकानदारांना शिवीगाळ करत दहशत निर्माण करून दुकाने बंद करण्यास सांगितले. काही दुकानांवर दगडफेकही झाली. या घटनेत जखमी संतोष सोनार यांना बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, असे फिर्यादित नमूद केले आहे. तर शुक्रवारी सचिन परब याचा कुरकुंभमध्ये लाईट दुरुस्तीचे काम करताना झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला असून सुरक्षेची काळजी सचिनला विद्युत पोलवर चढविले असल्याने त्याचा मृत्यू झाला असून, त्यास 8 ते 10 जण जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.