जम्मू – दक्षिण काश्मीरमधील बडग्राम जिल्ह्यातील चाडूरा जवळ मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने भारतीय सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. तसेच संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.
Jammu and Kashmir: Exchange of fire underway between terrorists and security forces in Gopalpora area of Kulgam. More details awaited. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/nk0uYoT22s
— ANI (@ANI) May 22, 2019
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बडग्राम येथील चाडूरा जवळच्या गोपालपोरा-कुलग्राम येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. या शोध मोहीमेदरम्यान परिसराला वेढा दिला असता दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसेच दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळी आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही बाजूने गोळीबार सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.