पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2017 मध्ये घेलेल्या परीक्षेचे निकाल नुकतेच लागले. यामध्ये स्थापत्य अभियंत्यांचा (इंजिनिअर) पदावर नियुक्त झालेल्यांचा “इन्फिनिटी’ अकॅडमीच्या वतीने अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डी. जी. तेलकीकर, संजय बोडखे, श्वेता कुऱ्हाडे, अमित उबाळे, सागर सोनावणे, प्रदीप मोरे, बालाजी चौधरीआदी उपस्थित होते. कोल्हे म्हणाले, “ज्या दिवशी एमपीएससीचा फॉर्म भरला, त्या दिवसापासून ट्रेनिंग सुरू होते आणि जेवढे जास्त शिकू तेवढे कळते, की आपल्याला किती कमी माहिती आहे.’ प्रसाद पाटील म्हणाले, “प्रांजळ व स्वच्छ मनाने काम केल्यास यश मिळते.’
परीक्षेत यशस्वी झालेले शुभम जोशी, ज्ञानेश्वर पोटे, प्रशांत कोरके, आयेशा सोळंकी, शीतल राजपूत, रोहिणी पळसकर, शुभम गुंडतवा, आश्विनी भोसले, कीर्ती कुंजीर, युवराज कोकरे, आरती कांबळे, अक्षय पगारे, शिवम देशमुख, हर्षल चव्हाण, सुनील शिंगाडे, गणेश पाटील, ज्योती आनंदकर, तेजस भोसले, शीतल वाहारे, स्वागत विरंगोळे, प्रतीक पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्तविक व आभार इन्फिनिटीचे संचालक गिरीश खेडकर आणि सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रईस खान यांनी पुढाकार घेतला.