पुणे,दि.15- इंन्टाग्रामवरील मैत्रीतून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी एका 49 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनूसार त्यांच्या 17 वर्षीय मुलीची इंस्टाग्रामवर एकाबरोबर ओळख झाली होती. त्याला भेटण्यासाठी ती शनिवारी दुपारी कात्रज डेअरी चौकामध्ये गेली होती. यानंतर तीला दुचाकीवर बसवून संबंधीत आरोपीने कांढव्यावरुन उंड्री येथील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तीच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. यानंतर तीला पुन्हा कात्रज येथील मोरेबाग येथे सोडले.