फलटण – येथील मंगळवार पेठेत अवैधरित्या दारू विकणाऱ्या सविता राजू भिसे हिला फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील मंगळवार पेठेतील मरिमाता मंदिराजवळ पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. सविता भिसे हिच्याकडून 1500 रुपयांची हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून पोलीस नाईक वीरकर तपास करत आहेत.