​#शिक्षक दिन : भारतातला आणि जगातला ​

पाच सप्टेंबर म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरात हा दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. शिक्षक हा समाजात परिवर्तन घडवून आणणारा घटक आहे. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक मुलांच्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात.

विसाव्या शतकापासून शिक्षक दिन जगभरात साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात जरी हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा करण्यात येत असला तरी जगभरात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात केला जातो. जगातील अनेक देशात पाच ऑक्टोबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.

१९३९ मध्ये कन्फ्यूशिअसचा जन्मदिवस म्हणून २७ ऑगस्ट रोजी हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला. पण १९५१ मध्ये हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर १९८५ मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला. आता मात्र पुन्हा एकदा अनेक लोकं कन्फ्युशिअसचाच वाढदिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात येत आहेत. रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. १९९४ सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)