५९ मिनिटांत एक कोटीचे कर्ज हा तर ‘चुनावी जुमला’च : अजित पवार

माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड येथे सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. सरकारच्या ५९ मिनिटांत एक कोटी रूपयांचे कर्ज उद्योजकांना देणार या घोषणेला अजित पवारांनी ‘चुनावी जुमला’ ठरवत म्हंटले की “लघु, सूक्ष्म असे उद्योग करणारे हजारो उद्योजक आहेत. मग इतक्या उद्योजकांना हे इतकं कर्ज कसं देणार, शक्य तरी आहे का?” “हे सर्व निवडणुकीसाठी सुरूअसून, सत्तेत आल्यानंतर हेच लोक म्हणणार की हा तर चुनावी जुमला होता,”

राज्य सरकारने नुसताच दुष्काळ जाहीर केला आहे पण उपाययोजनांच्या नावाने मात्र बोंब आहे. भाजपचा सगळाच भोंगळ कारभार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी पवारांनी सध्या देशामध्ये राम मंदिराबाबत सुरु असलेल्या चर्चांबाबत बोलताना सांगितले की “आता निवडणुका जवळ आल्याने राम मंदिरचा विषय काढला जात आहे. केवळ समाज दुभागून एका समाजाची मतं मिळवण्यासाठीचा उपद्याप आहे. तिकडे शिवसेना आता अयोध्येला जाणार म्हणे. राम हे नाव चर्चेत आलं की समजायचं निवडणुका आल्या.”

“भाजप-शिवसेनेला राम नाम निवडणुकांच्या वेळीच आठवतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून हे सत्तेत आलेत पण आज यांना ते आठवतात का?” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

काल राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत ४८ जागांपैकी तीन चतुर्थांश जागांवर आघाडीचं एकमत झाले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. समविचारी पक्षांनी एकत्र येण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. अगदी प्रकाश आंबेडकर आमच्याबद्दल काही बोलले असले तरी आम्ही त्यांच्यासोबत पुन्हा चर्चेसाठी तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आत्ता ज्या जागांवर एकमत झालं आहे, त्यापैकी काही जागा आम्ही मित्रपक्षांना देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)