५६ इंचाची छाती असेल तर सरकारने राम मंदिरासंदर्भात अध्यादेश काढून दाखवावा – ओवेसी 

नवी दिल्ली – रामजन्मभूमी बाबरी मशीद या वादग्रस्त प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता जानेवारी २०१९ मध्येच होणार आहे. या निर्णयानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारला थेट आव्हानच दिले आहे. ५६ इंचाची छाती असेल  तर मोदी सरकारने अध्यादेश काढून दाखवावा, असे आव्हान ओवेसी यांनी दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले कि, राम मंदिराबद्दल अध्यादेश का आणत नाही. त्यांनी अध्यादेश आणावा. भाजप, आरएसएस आणि विहिंप मधील कोणताही नेता अध्यादेशाबद्दल वक्तव्य करत असतो. प्रत्येक वेळेस अध्यादेश आणण्याची धमकी दिली जाते. मी तुम्हाला आव्हान करतो कि, ५६ इंचाची छाती असेल तर सरकारने अध्यादेश काढून दाखवावा, असे त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)