५५० कोटींच्या रुपयांच्या योजनांची काशीमध्ये सुरुवात – पंतप्रधान मोदी

आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला जन्मदिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यास मदत करणाऱ्या काशीवासियांना रिटर्न गिफ्ट दिली आहे. त्यांनी काही नवीन योजनांचा पाया काशीमध्ये घातला असून या योजनापूर्ण करण्यासाठी त्यांनी ५५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे.

मागील चार वर्षात काशीमध्ये झालेल्या विकासकार्यांचा आढावा देताना ते म्हणाले, ‘काशी  बदलले आहे आणि संपूर्ण जग त्याच्या विकसित स्वरूपाकडे पाहात आहे. तुम्ही मला निवडू दिलेले आहे त्यामुळे एक संसदपटू म्हणून मी केलेले कार्य तुम्हाला सांगणे हे माझे कर्तव्य आहे. मी जे काही सांगितले ते फक्त झलक आहे. मी तूम्हाला एका एका पैशाचा हिशोब देणार आहे. ‘

-Ads-

“वाराणसी शहरच नाही तर त्याच्या जवळचे सर्व गावांना रस्ते, पाणी आणि वीज पोहचली आहे. एक संसदपटू म्हणून ज्या काही गावांना विशेषपणे विकसित करण्याचे काम माझ्याकडे आहे त्यापैकी नागेपुर गावयाची पाण्याची समस्या पूर्णपणे सोडवण्यातही एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. ”

आपण सर्वांनी मिळून वाराणसीमध्ये होत असलेल्या या विकासपूर्ण बदलाला पाठिंबा देण्याचा निश्चय करू आणि ‘नवी काशी, नवा भारत’ च्या निर्माणासाठी पुढे येऊन योगदान करण्याचे देखील मोदींनी आवाहन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)