४८ वर्षांपेक्षा आमचे ४८ महिन्यांचे काम जास्त – नितीन गडकरी

नवी दिल्ली : नेहरू-गांधी घराण्याच्या ४८ वर्षांच्या राजवटीत झाली नाहीत इतकी कामे मोदी सरकारच्या ४८ महिन्यांत सुरू झाली, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला.

केंद्रातील मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत मांडला. मोदी सरकारच्या ४८ महिन्यांच्या कालावधीत फार मोठे सामाजिक व आर्थिक परिवर्तन आपल्या देशात झाले आहे. पायाभूत सुविधांची कामे प्रचंड वेगात सुरू आहेत. काँग्रेसच्या काळात राष्ट्रीय महामार्ग बांधणीचा वेग दर दिवशी दोन किलोमीटरवर आला होता. आमच्या सरकारने तो दररोज २७ किलोमीटपर्यंत वाढवला आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

-Ads-

लोकांच्या सर्व अपेक्षा अद्याप पूर्ण झाल्या नाहीत हे खरे असले तरी आठ कोटी कुटुंबांना घरगुती गॅस, बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या कोटय़वधी गरिबांना बँकेशी जोडणारी जन-धन योजना, दहा कोटी कुटुंबांना पाच लाखांचा आरोग्यविमा देणारी आयुष्मान योजना, ग्रामीण भागात वीजजोडणी अशी लोकांच्या जीवनात अच्छे दिन आणणारी अनेक कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारने केली आहेत, असेही गडकरी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)