३ वर्षांच्या लहानगीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास २० वर्षांची शिक्षा 

मथुरा: बाल लैंगिक शोषण अत्याचार गुन्ह्यांची तपासणी करणाऱ्या मथुरा येथील विशेष न्यायालयाने आज ३ वर्षीय लहानगीवर बलात्कार करणाऱ्या ‘विशंभर’ नामक नराधमास २० वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी या प्रकरणी न्यायदान करताना “गुन्हेगाराची पाशवी मानसिकता लक्षात घेता, तो असे गुन्हे पुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच त्याला २० वर्षांची कठोर शिक्षा सुनावत आहे.” असे विधान केले.
तत्पूर्वी ही घटना ५ डिसेंबर २०१५ रोजी घडली होती. लहान मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत खेळत असता, नराधमाने तिला एकांतात न्हेऊन अत्याचार केले होते. मुलीचा रडल्याचा आवाज ऐकून तिच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत आरोपीने तेथून पोबारा केला होता. न्यायालयाने राज्यसरकारला पीडित मुलीच्या कुटुंबीयांस १ लाख रुपयांची मदत करण्याचे देखील आदेश दिले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)