‘३६५ दिवस २४ तास, एकच ध्यास गावाचा विकास…’ 

३६५ दिवस २४ तास, एकच ध्यास गावाचा विकास.... हा नारा घेवून निवडणूकीच्या रणांगणात उतरलेला हा अवघा १५ वर्षांचा अभिमन्यू मतदारांना माहिती देताना. छाया :- नितिन शेळके

हा नारा घेवून निवडणूकीच्या रणांगणात उतरलेला अवघा १५ वर्षांचा अभिमन्यू
संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव या राजकिय व सामाजिक चळवळींच्या गावातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत, प्रभाग तीन मधील अपक्ष उमेदवार संतोष लक्ष्मण पिसाळ यांच्या नववीतल्या मुलाने सुरु केलेला प्रचाराचा फंडा चांगलाच लोकप्रिय होत आहे.

घारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सदस्यपदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे संतोष पिसाळ यांना काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात पायाला मार लागल्याने त्यांच्या हालचालींवर मर्यादा पडल्या आहेत. मात्र त्यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी भारत हायस्कूल मध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या त्यांचा मुलगा राजवर्धन या मुलाने सांभाळली आहे. त्यासाठी मोबाईल या आधुनिक प्रचार माध्यमाचा उपयोग त्याने सुरु केला. त्याचबरोबर त्याच्या प्रभाग तीन मधील मतदारांच्या घरी जाऊन, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे, निवडणूक चिन्ह समजावून देण्याचे कामही तो एकट्यानेच करतो आहे. बोलक्या, निर्धास्त, सडेतोड स्वभावाच्या राजवर्धनने अल्पावधीतच सर्वांची मने काबीज केली आहेत.  आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, माझे वडील संतोष पिसाळ आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून, प्रभाग तीन मधून उभे आहेत. कोणत्याही पक्षाचा शिक्का नसलेल्या अपक्ष उमेदवाराला आपले मत द्या असे सांगून, तो त्यांच्या वतीने मतदारांना ते करणार असल्याच्या विकासकामांची माहिती देतो. ३६५ दिवस २४ तास, एकच ध्यास गावाचा विकास…. हा नारा घेवून निवडणूकीच्या रणांगणात उतरलेला हा अवघा १५ वर्षांचा अभिमन्यू इतर मातब्बर उमेदवारांचे चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करतो आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या प्रचाराला तडाख्याने सुरुवात झाली आहे. पक्ष,  कार्यकर्ते, संघटना यांचे पाठबळ लाभल्याने काहीसे निर्धास्त असलेल्या इतर उमेदवारांच्या पार्श्वभुमीवर, वडीलांच्या यशासाठी एकाकी झुंजणारा राजवर्धन आकर्षणाचा केंद्रबींदू ठरला आहे. इतर पक्षांच्या बाहुबली उमेदवारांच्या तुलनेतत्यांच्या पैशांच्या, ओल्या सुक्या पार्ट्यांच्या बळापुढे कोणीही प्रबळ पाठींबा किंवा कार्यकर्ताही नसताना, तो वडीलांच्या विजयासाठी धडपडत आहे. दुस्ऱअया उमेदवारावर किंवा त्यांच्या वाईट बाबींवर भाष्य करण्याचे देखील तो टाळतो. मतदानासाठी पैसे घेवून लाचार होवू नका असे सांगत, त्यांच्यातील स्वाभीमान जागा करतो.  निवडून आल्यावर प्रभागातली कामे न झाल्यास तुमची चप्पल आणि आमचे तोंड असे आव्हानही तो देतो. राजवर्धनने त्याच्या प्रभागात एकट्याच्या बळावर सुरु केलेला प्रचार मतदारांना आकर्षित करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)