३१ मार्चपर्यंतच ‘या’ बँकांचे चेकबुक राहणार वैध

मुंबई : मार्च एंडिंग हा तसा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. त्यामुळे तुमची बँकेतील काही कामे राहिली असतील तर ती लवकर करून घ्या, विशेषतः एसबीआय बँकेची….कारण एसबीआयच्या असोसिएट बँका आणि भारतीय महिला बँकेचे चेकबुक ३१ मार्चपर्यंत बदलून घेण्याबाबाबतचे आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाने दिले आहेत.

३१ मार्चनंतर महिला बँकेसह एसबीआयच्या काही असोसिएट बँकांची चेकबुक वैध मानण्यात येणार नाहीत. जर तुम्ही त्यापूर्वी चेकबुक बदलली नाहीत तर तुमच्यासाठी समस्या होऊ शकते. गेल्या वर्षी भारतीय महिला बँक, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ त्रवणकोर या बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण झाले.

या बँकाचे एसबीआयमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर एसबीआयने यांच्या चेकबुक बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिली होती. त्यानंतर ही मर्यादा वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली होती. मात्र ग्राहकांची समस्या लक्षात घेता ही मर्यादा ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. जर तुमच्याकडेही वर दिलेल्या सहा बँकांपैकी कोणत्या बँकेचे चेकबुक असेल तर लगेचच बदलून घ्या. एसबीआयने आपल्या ग्राहकांना ट्विटरवरुन ही माहिती दिलीये. जर तुम्ही ३१ मार्च आधी चेकबुक बदलून घेतले नाही तर १ एप्रिलनंतर तुमचे जुने चेकबुक चालणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)