‘२.०’ टीजर प्रदर्शित- पहा व्हिडिओ

साऊथ सुपरस्टार रजनीकांत हे पुन्हा चिट्टी रोबोटच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला  येणार आहे. रोबोट चित्रपटाचा पुढील भाग असलेला सिनेमा २.० याचा टीजर प्रदर्शित झाला आहे. गणेश चतुर्थीचे औचित्य साधून सकाळी ९ वाजता हे टीजर रिलीज करण्यात आले.
या सिनेमात जरी प्रमुख भूमिकेत रजनीकांत असलेतरी टीजरमध्ये खलनायकाच्या भूमिकेत असलेला अक्षय कुमार भाव खाऊन जतोय. जवळजवळ दीड मिनिटे दाखवलेल्या या टीजरमध्ये खलनायक अक्षय कुमार शहरातील सर्व मोबाईल फोन  आपल्या शक्तीने खेचुन घेतो. त्यानंतर एका पक्षाचे रूप घेऊनसर्व शहरात दहशत निर्माण करतो.

 

या चित्रपटामुळे अक्षय कुमार आणि रजनीकांत प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत. या चित्रपटाला ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रेहमान यांनी संगीत दिले आहे. त्याचबरोबर एमी जॅकसनला देखील या चित्रपाटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)