२७ मार्चला शेतीपंप वीज दरवाढीविरोधात मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

कोल्हापूर – शेती पंप वीज व पाणी पट्टी दर वाढीविरोधात मंगळवारी  २७ मार्चला मंत्रालयावर काढण्यत येणाऱ्या धडक मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील -किणीकर व उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील -भुयेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

महावितरणने ३ ते १०० एच. पी. विद्युत पंपाच्या युनिट दरात तब्बल १५४ टक्के तर उपसा जलसिंचन योजनाच्या दरात २७४ टक्के वाढ केली. याविरोधात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ नोव्हेंबर २०१७ ला मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात काहीतरी तोडगा काढू, अशी ग्वाही दिल्याने आंदोलन स्थगित केले. पण काहीच निर्णय न घेता शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा महावितरणने लावल्यानं हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)