वायनाडमधून राहुल गांधींना ‘मोठी’ आघाडी; अमेठीत अजूनही स्मृती इराणीच पुढे

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे यंदाच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना भरगोस मताधिक्य मिळत असून ताज्या आकडेवारीनुसार राहुल गांधी यांना आतापर्यंत ५९९२८१ एवढं मताधिक्य मिळालं आहे. त्यांच्यापाठोपाठ कम्युनिस्ट पक्षाचे पी पी सुनीर हे दुसऱ्या स्थानावर असून त्यांना २०२४२४९ एवढी मतं मिळाली आहेत. येथील भाजप पुरस्कृत उमेदवार तुषार वेलापल्ली यांना ७५५१८ एवढी मतं मिळाली आहेत.

असं असलं तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आपला पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठी येथून पिछाडीवर असून येथून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी या ६२५२४ मतांसह आघाडीवर आहेत. राहुल गांधींना अमेठीतून आतापर्यंत ५९८३६ मतं मिळाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)