२०१९ लोकसभा निवडणूक दोन विचारांचे वैचारीक युद्ध ! -अमित शहा

नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा एकदा केंद्रात ”एनडीए’ सरकार येईल, या विश्वासाने लोकसभा निकावडणुकीचे जोरदार रणशिंग फुंकले आहे. २०१९ ची निवडणूक ही दोन विचारांची लढाई असून, ती कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असे, आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच नरेंद्र मोदी सत्तेत येण्याअगोदर देश पूर्णपणे असुरक्षित होता. असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना २०१९ लोकसभा निडणुकीत भाजपला मोठा विजय मिळेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. आगामी निवडणूक ही दोनप्रकारच्या विचारधारा असणारे एक वैचारीक युद्ध असून, ही लढाई जिंकली तर या विजयाचा प्रभाव टीकून राहणार आहे. त्यामुळे हा विजय अतिशय महत्वाचा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते समोर म्हणाले, आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षां पासून रखडली होती. मात्र मोदी सरकारने हे आरक्षण देऊन कोट्यवधी तरुणांचे स्वप्न पूर्ण केले आहे. अश्या शब्दात त्यांनी सरकारच्या कारभाराची स्तुती केली. विवेकानंदाना अपेक्षित भारत आम्ही मोदिंच्या मार्गदर्शनाखाली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमित शहा यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)