२०१९ ठरेल गुंतवणुकीसाठी उत्तम वर्ष (भाग-१)

बहुतांशी गुंतवणूक पर्यायांमध्ये २०१८ साली मिळालेला परतावा हा त्याच्या मागील अनेक वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी मिळाला आहे. परंतु २०१९ हे वर्ष आर्थिक पर्यायांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी ठरू शकते.

२०१८ हे वर्ष अनेक महत्त्वपूर्ण घटनांनी व वेगवान घडामोडींनी भरलेले ठरले. जवळपास सर्वच प्रकारच्या गुंतवणुकीच्या पर्यायांनी आपल्या मागील अनेक वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी परतावा दिला आहे. कारण जागतिक व स्थानिक पातळीवर घडलेल्या अनेक विलक्षण घटना यासाठी कारणीभूत ठरल्या. २०१८ च्या सुरवातीलाच अनेक आर्थिक तज्ञांनी गुंतवणूकदारांना परताव्याबाबत मध्यम स्वरुपात ठेवण्यास सांगितले होते. कारण २०१८ हे वर्ष अनेक घडामोडींचे ठरणार याचा अंदाज आलेला होता. शेअरबाजारातही या सर्वांचा मोठा परिणाम होणार आहे हे माहित असल्याने फार मोठ्या परताव्याच्या अपेक्षा २०१८ च्या वर्षात ठेवू नका असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात २०१८ साली भारतीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक परतावा ५.९० टक्के आला. प्रथमदर्शनी सदर परतावा मागील सरासरीपेक्षा कमी दिसत असला तरी तो सकारात्मक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकाने (बीएसई सेन्सेक्स) ५.९० ट्क्के परतावा दिला आहे. परंतु इतर निर्देशांकात नुकसान झालेले आहे. जगातील शेअर बाजारातील परतावा आणि भारतीय प्रमुख निर्देशांकाचा विचार करता २०१८ मध्ये भारतीय प्रमुख निर्देशांक मात्र फारच चांगला परतावा देऊन गेला आहे.

२०१९ ठरेल गुंतवणुकीसाठी उत्तम वर्ष (भाग-२)

जगातील प्रमुख शेअर बाजारातील परताव्याची तुलना

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)