२०१९ ठरेल गुंतवणुकीसाठी उत्तम वर्ष (भाग-२)

२०१९ ठरेल गुंतवणुकीसाठी उत्तम वर्ष (भाग-१)

२०१८ चा परामर्श घेतल्यावर २०१९ या वर्षाची सुरवात करताना देशातील चित्र अधिक आश्वासक दिसत आहे. अनेक आर्थिक तज्ञांच्या मते, २०१९ हे वर्ष संपूर्णपणे वेगळे वळण देणारे ठरू शकते. अनेक जागतिक व स्थानिक नकारात्मक घटनांची चाहूल व त्याचे होणारे परिणाम या सर्वांची दखल शेअर बाजाराने घेऊन झाली आहे. यामुळे आता आणखी फार मोठ्या पडझडीची शक्यता येणाऱ्या काळात दिसत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय उद्योगांनी गेली काही वर्षे सातत्याने कमाईतील वाढती घसरण (लो अर्निंग) अनुभवली आहे. अनेक उत्पादने बनवणाऱ्या खासगी कंपन्या आपल्या उत्पादनांचा फार मोठा उठाव (विक्री) होताना पहात नव्हत्या. गेल्या वर्षात अनेक प्रकारच्या कच्च्या मालाच्या किंमती गेल्या वर्षात वेगाने खाली आल्या आहेत. त्यामुळे यापुढे त्यांचा नफा वाढण्याची चिन्हे आहेत. कमाईतील वाढती घसरण (लो अर्निंग) २०१९ मध्ये बदलताना दिसते आहे. सर्व प्रकारच्या कच्च्या मालाच्या व तेलाच्या किंमती खाली आल्याने या वर्षी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. २०१८ साली यामुळे अनेक बँकांनी दिलेल्या कर्जांमध्ये एनपीए (बुडीत कर्जे) ची वाढ मोठ्या प्रमाणात झाली. परंतु २०१९ मध्ये कंपन्या आपले कर्ज फेडत असल्याचे चित्र दिसणार असल्याने ही परतफेड बँकांच्या नफ्यात वाढ करणार आहे. भारताच्या प्रमुख निर्देशांकात फायनान्स आणि बँकिंग या क्षेत्राचा जवळपास ४१ टक्के वाटा आहे. यावरून यातील सकारात्मकतेचा आवाका येऊ शकतो. भारतातील तीन प्रमुख बँका स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक व अक्सिस बँक यांच्याकडून वर्ष २०१९-२० मध्ये जवळपास २० टक्क्यांपेक्षा जादाची कर्जे उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना दिली जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादनवाढीस चालना मिळणार आहे.

वर्ष २०१८ मध्ये मध्यम आकाराच्या व छोट्या आकारच्या अनेक कंपन्यांचे मूल्य शेअर बाजारात  मोठ्या आकाराच्या कंपन्यांच्या मूल्यापेक्षा जास्त महाग झाले होते. परंतु वर्ष संपता संपता हे मूल्य बऱ्याच अंशी सामान्य पातळीवर आले आहे किंवा स्वस्त झाले आहे असे म्हणता येईल. २०१८ च्या वर्षात भारतीय गुंतवणूकदारांनी मात्र शेअरबाजारावर मोठा विश्वास दाखवला आहे व सातत्याने भारतीय बाजारातील गुंतवणूक वाढवत नेली आहे. म्युच्युअल फंडांमध्ये होणाऱ्या मासिक नियमित गुंतवणुकीमध्ये (एसआयपी) सातत्याने मोठी वाढ झाली आहे. ही देखील भारतीय बाजारांसाठी खूप मोठी सकारात्मक बाब आहे.

म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये गुंतवलेली  एकूण रक्कम (गुंतवणूक – कोटी रुपयांमध्ये –  अॅम्फी)

२०१९ च्या वर्षात निश्चितच भारतीय गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याचा काळ आलेला आहे असे नक्कीच म्हणता येईल.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)