२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-१)

बचत वाढवा आणि समजुतदारपणे गुंतवणूक करा, दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा संकल्प २०१९ च्या सुरवातीलाच करा. ठळक आर्थिक घटनांची नोंद घेतल्याने आपल्याला ठरवलेल्या आर्थिक उद्दीष्टांकडे दमदारपणे वाटचाल करता येणार आहे.

जानेवारी – योग्य आर्थिक नियोजन करा.

आपली नेमकी आर्थिक उद्दीष्टे ठरवा. त्यासाठी नेमका किती काळ आपणास द्यावयाचा आहे हे देखील आजच ठरवा. ठरवलेल्या उद्दीष्टांसाठी योग्य अशा गुंतवणूक पर्यायाची निवड करा. या सगळ्या नियोजनासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. आपले उत्पन्न व उद्दीष्टे यांची संपूर्ण माहीत समजून घेऊन योग्य आर्थिक नियोजन केल्यास, त्यासाठी योग्य तो सल्ला घेतल्यास गुंतवणुकीसाठीचे योग्य पाऊल उचलता येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फेब्रुवारी – स्वप्नांचे नियोजन

१४ फेब्रुवारीला येणाऱ्या व्हॅलेंटाईन डे ला आपल्या पत्नीसोबत एकत्र बसून आपल्या स्वप्नाबाबत तिच्याशी चर्चा करा. त्यासाठी केलेले नियोजन व योग्य गुंतवणूक पर्यायांची जोडीदाराला माहिती द्या.

१ फेब्रुवारी – हंगामी अर्थसंकल्प मांडला जाणार

६ फेब्रुवारी – आर्थिक नीती ठरवण्यासाठी रिझर्व्ह बँकेची बैठक होणार आहे.  सीआरआर, एसएलआर, रेपो, रिव्हर्स रेपो याचे व्याजदर ठरवले जातील. या सर्वांवर बाजार दिशा ठरवेल.

२८ फेब्रुवारी – जीडीपीच्या आकड्यांची घोषणा होणार, या आकड्यांचा परिणाम बाजारावर होणार

मार्च – प्राप्तीकराचे नियोजन

कर रचनेनुसार आपल्या विविध प्राप्तीकर कलमानुसार सवलतींची माहिती घ्या. प्राप्तीकर सवलतीसाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडून प्राप्तीकराचे ओझे कमी करता येऊ शकते.

१५ मार्च – शेवटचा आगाऊ प्राप्तीकर भरण्याची अंतिम तारीख (२०१८-१९)

३१ मार्च – आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्याची शेवटची तारीख व २०१७-१८ चे प्राप्तीकर विवरण भरण्याची शेवटची तारीख. यानंतर जर हे विवरण भरले तर रू. १०,००० ची दंडात्मक रक्कम द्यावी लागेल.

एप्रिल – एप्रिल फूल बनू नका.

गुंतवणूक करताना योग्य अभ्यास करून निर्णय घ्या. दुसऱ्याच्या अनुभवावर आपली गुंतवणूक करू नका. अशक्यप्राय परतावा अत्यंत कमी काळात देण्याचे आश्वासन देणाऱ्या योजनांपासून दूर रहा. चुकीच्या गुंतवणूक पर्यायांपासून लांब रहा. यामुळे आपण एप्रिल फूल होणार नाही याची दक्षता घ्या.

१ एप्रिल – प्रत्यक्ष शेअर प्रमाणपत्र डी-मॅट स्वरुपात करून घेण्याची अंतिम तारीख.

२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-२)

मे – उन्हाळ्याच्या सुटीचे नियोजन

आपल्या कुटुंबियांसोबत कोणतेही तडजोड न करता आपली सुटी एका चांगल्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे नियोजन करा. आर्थिक नियोजन गडबडणार नाही याची काळजी घ्या. हे करत असतानाच सहलीसाठी उत्कृष्ठ सहल संयोजक गाठा तसेच आकर्षक सहलींची निवड करा. परदेशी सहलींसाठी प्रवास विमा घ्यायला विसरू नका. सहलीमध्ये क्रेडिट कार्डवर खरेदी करताना योग्य दक्षता घ्या.

७ मे – अक्षयतृतीया – सोने खरेदीसाठीचा उत्तम मुहूर्त. जर आपल्या एकूण गुंतवणुकीच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी रक्कम सोन्यात गुंतवलेली असेल तर सोने खरेदी करायला हरकत नाही. यासाठी गोल्ड ईटीएफ या उत्कृष्ठ पर्याय आहे.

३१ मे – जीडीपीचे आकडे जाहीर होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)