२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-२)

बचत वाढवा आणि समजुतदारपणे गुंतवणूक करा, दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा संकल्प २०१९ च्या सुरवातीलाच करा. ठळक आर्थिक घटनांची नोंद घेतल्याने आपल्याला ठरवलेल्या आर्थिक उद्दीष्टांकडे दमदारपणे वाटचाल करता येणार आहे.

२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-१)

जून – वर्षाच्या मध्याला आपल्या गुंतवणुकीचा परामर्श घ्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्षाच्या सुरवातीलाच केलेले गुंतवणुकीच्या नियोजनाचा परामर्श घ्यावा. जर काही गुंतवणूक पर्याय अपेक्षित परतावा देत नसतील तर त्याबाबत काही बदल करणे आवश्यक असेल तर तो करण्याचा निर्णय घ्या. आर्थिक उद्दीष्टांसाठी गुंतवणुकीसाठी रक्कम कमी पडत असेल तर आपली बचत वाढवून गुंतवणुकीस वेग द्या.

५ जून – आरबीआयची तिमाही बैठक. यामध्ये पुढील आर्थिक वाटचालींबाबत निर्णय.

१५ जून – प्रथम आगाऊ प्राप्तीकर भरण्याची (अॅडव्हान्स टॅक्स) अंतिम तारीख २०१९-२०

जुलै – पावसाळी दिवस आणि गुंतवणूक.

अकस्मात येणाऱ्या खर्चांसाठी गुंतवणुकीची तरतूद करा. आपल्या किमान पुढील तीन महिन्यांच्या खर्चाला लागणारी रक्कम यासाठी तयार करा. जर काही कारणांनी पैशांची आवक बंद झाली तर त्यावेळी या रक्कमेची गरज भासणार आहे. यासाठी म्युच्युअल फंडातील लिक्विड फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आपल्यासाठी व कुटुंबियांसाठी आरोग्य विमा घ्या.

३१ जुलै – आपले प्राप्तीकर विवरण भरण्याची अंतिम तारीख. जर विवरण भरण्यास उशीर केला तर त्यानंतर रू. ५००० चा दंड लागेल आणि जर प्राप्तीकर विवरण ३१ डिसेंबरपर्यंत न भरल्यास हा दंड रू. १०,००० होईल.

ऑगस्ट – आर्थिक स्वातंत्र्याची घडी.

गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटीचा योग्य सहभाग ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून आपले उत्पन्न वेगाने वाढेल. पुढील वर्षात येणाऱ्या अनियोजित प्राप्तीकराचे नियोजन योग्य पद्धतीने येईल. त्यासाठी म्युच्युअल फंडातील कर सवलत देणाऱ्या योजनांचा विचार करता येईल.

७ ऑगस्ट – आरबीआयची तिमाही बैठक, पुढील काळातील आर्थिक नियोजन

१५ ऑगस्ट – आर्थिक स्वातंत्रदिन साजरा करा.

३० ऑगस्ट – जीडीपीच्या आकड्यांची घोषणा

सप्टेंबर – येणाऱ्या सण-समारंभांचे आर्थिक नियोजन.

आपल्या संस्कृतीप्रमाणे दरवर्षी येणाऱ्या सणसमारंभांच्या खर्चाचे नियोजन करण्याची ही वेळ आहे. सणांसाठी खरेदी करताना फसव्या आकर्षक जाहिरातींना न भुलता आवश्यक खर्चासाठी पैसे साठवून ठेवा. अनावश्यक सोने खरेदी या काळात टाळा.

१५ सप्टेंबर – आगाऊ कर (अडव्हान्स टॅक्स) भरण्याची अंतिम तारीख (२०१९-२०)

ऑक्टोबर – शरद ऋतुचे आगमन.

निवृत्तीसाठीचे नियोजन करा व त्यासाठी गुंतवणुकीस सुरवात करा. आपल्या सध्याच्या व भविष्यातील गरजांचा विचार करून महागाई दर, व्याजदर इत्यादी गोष्टींचा गुंतवणूक करताना विचार करा. गुंतवणुकीत ग्रोथ या पर्यायाची निवड  करा. यामुळे भविष्यात चक्रवाढ दराने मिळणाऱ्या परताव्याचा फायदा तुम्हांला मिळणार आहे.

९ ऑक्टोबर – आरबीआयची तिमाही बैठक.

२५ ऑक्टोबर – धनत्रयोदशी. शुभमुहुर्तावर घर, चार चाकी वाहन, घेण्याचे नियोजन करा व त्याची सुरवात आर्थिक पर्यायांमध्ये गुंतवणूक करून करा.

नोव्हेंबर –मुलांच्या भविष्याचे नियोजन करा.

१४ नोव्हेंबरला येणाऱ्या बालदिनानिमित्त आपल्या मुलांच्या भविष्यासाठीचे गुंतवणूक नियोजन करा. उच्च शिक्षण, व्यवसाय, लग्न इत्यादीसाठी योग्य आर्थिक पर्यायांची निवड करा.

डिसेंबर – स्वतःचे अभिनंदन करण्याची वेळ.

आपण केलेल्या वर्षभरातील आर्थिक नियोजनात काय काय ठरवलेले आहे व काय करायचे राहून गेले आहे. याचा आढावा घ्या. पुढील वर्षासाठी आणखी सुनियोजित आर्थिक नियोजन कसे करता येईल याचा विचार करा. ३६५ दिवस कष्ट करून कमावलेल्या पैशांचे योग्य नियोजन झाले आहे का याचा विचार झाला पाहिजे. पुढील वर्षासाठी आणखी चांगले नियोजन कसे करता येईल याचा संकल्प करा.

४ डिसेंबर – आरबीआयची तिमाही बैठक

१५ डिसेंबर – आगाऊ कर भरण्याची तृतीय अंतिम तारीख (२०१९-२०)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)