२०१४च्या निवडणुकांआधी देशात अनिश्चिततेचा काळ- राष्ट्रपती

नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा  अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी मोदींचे सरकारच्या कामांचा पाच वर्षाचा लेखा-जोखा मांडला. २०१४च्या निवडणुकांआधी देशात अनिश्चिततेचा काळ होता. परंतु, निवडणुकांनंतर मोदी सरकारने नवीन भारतासाठी प्रयत्न सुरु केला. असे रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

भाषणाच्या सुरुवातीला  राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले कि, २०१९ वर्ष लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. कारण यावर्षी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आपण साजरी करत आहोत. महात्मा गांधी जयंतीनिमित्त मोदी सरकारने संपूर्ण देशाला स्वच्छ बनवण्याचा संकल्प घेतला. त्यानुसार, स्वच्छ भारत योजनेतून ९ कोटींपेक्षा अधिक शौचालायांची निर्मिती करण्यात आली. गरिबांना लक्षात घेऊन आयुष्यमान योजना सुरु करण्यात आली. या योजनेचा ४ महिन्यात १० लाखांपेक्षा जास्त गरिबांनी लाभ घेतला. उज्वला योजनेंतर्गत आजवर ६ कोटींपेक्षा अधिक लोकांना गॅस जोडणी देण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा केवळ चार महिन्यांतच १० लाखांहून अधिक लोकांनी फायदा घेतला. जनऔषधी परियोजनेंतर्गत जनआरोग्य केंद्रात ७०० पेक्षा अधिक औषधे कमी किंमतीत उपलब्ध करुन दिली जात आहेत. २१ कोटी लोकांना वीमा योजनेचे कवच उपलब्ध करुन देण्यात आले आहे.  कुपोषण दूर करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय पोषण मिशन सुरु केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे ग्रामीण आणि नागरी भागात घरांच्या निर्मितीला सुरुवात केली. ग्रामीण भागात १ कोटी ३० लाख घरांची निर्मिती करण्यात आली. रेरा कायद्याने बिल्डर लॉबीवर आळा घातला आला. अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर उज्वला योजनेतून २ कोटी ४७ लाख घरांमध्ये वीजेचे कनेक्शन देण्यात येत आहे. तरुणांसाठी सरकारने कौशल विकास अभियान सुरु केले. त्याअंतर्गत आगामी काळात १५ पेक्षा जास्त आयटीआय, ६ हजारांपेक्षा अधिक कौशल विकास केंद्र सुरु होतील. मुद्रा योजनेंतर्गत ४ कोटी २६ लाख लोकांनी कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरु केला, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)