२जी स्पेक्ट्रमधील आरोपींना न्यायालयाकडून नोटीस

नवी दिल्ली – २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील मनी लॉण्डरिंग प्रकरणी माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा आणि डीएमके खासदार कनिमोझी यांची सुटका केल्याच्या विरोधात सक्तवसुली संचलनालयाने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  दरम्यान सक्तवसुली संचलनालय आणि सीबीआयने दाखल केलेल्या या  याचिकेवर आता  दिल्ली उच्च न्यायालयाकडून  २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींना नोटीस पाठवण्यात आली आहे.

आता याबात पुढील सुनावणी  २५ मे रोजी  होणार आहे.गेल्यावर्षी २१ डिसेंबरला विशेष सीबीआय न्यायालयाने ए राजा, डीएमके प्रमुख एम करुणानिधी यांची पत्नी दयालू अम्मल आणि मुलगी कनिमोझी यांच्यासहित १६ जणांची मनी लॉण्डरिंग प्रकरणी सुटका केली होती. यावेळी न्यायालयाने जप्त करण्यात आलेली २२३ कोटींची संपत्तीही परत करण्याचा आदेश दिला होता.या निर्णयाविरोधात सक्तवसुली संचलनालयाने आता  उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)