१ फेब्रुवारी आहे, १ एप्रिल नाही ! ; जयंत पाटलांनी केले रिट्विट

अहमदनगर: केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी २ हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ६ हजार थेट बँक खात्यात करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारने सादर केलेल्या बजेटवर टीका केली आहे. मोदी सरकारने फक्त घोषणांचा पाऊस पाडला तसेच यापूर्वी कुणीच काही दिलं नाही असं भासवले. आश्वासनांच्या गाजरांना बळी पडू नका. मोदी जे बोलतात ते कधीही करत नाहीत. असे महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले.

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1091205294271619073

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)