१९ व्या शतकात जन्मलेल्या शेवटच्या महिलेचे निधन

वॉशिंग्टन : १९ व्या शतकात जन्मलेल्या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे वयाच्या ११७ व्या वर्षी निधन झाले आहे. नाबी ताजीबा असे त्यांचे नाव होते. त्या मुळच्या जपानच्या होत्या. ४ ऑगस्ट १९०० मध्ये त्यांचा जन्म झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर रविवारी त्याचे रुग्णालयातच वृद्धापकाळाने निधन झाले.

सात महिन्यांपूर्वी जगातील सर्वाधिक वय असलेल्या महिलेचा मान त्यांना मिळाला होता. याआधी जमैकामधल्या महिलेच्या नावे हा विक्रम होता. ‘नाबी या कष्टाळू होत्या. आयुष्यभर त्यांनी कष्ट केले. आता त्यांच्या आत्म्याला शांती मिळो’ अशी प्रतिक्रिया त्यांच्या ६५ वर्षांच्या नातवाने दिली आहे. दरम्यान, आता जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून जपानचे ११२ वर्षीय मसाझो नोनाका ओळखले जातात. २५ जुलै १९०५ मध्ये त्यांचा जन्म झाला. नोनाका हे सर्वात वयोवृद्ध असल्याचे प्रमाणपत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने त्यांना दिले आहे. जपानच्या उत्तरेकडील होकायडो बेटावर नोनाका यांचे वास्तव्य आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)