१८८ प्रवासी घेऊन निघालेले लायन एअरवेजचे विमान कोसळले 

जकार्ता – इंडोनेशियाची राजधानी जर्कातामध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. लायन एअरवेजचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच समुद्रात कोसळले. या विमानात क्रू मेंबर्ससहित १८८ प्रवासी प्रवास करत होते.

लायन एअरवेजचे जेटी ६१० हे विमान जकार्ताहून पान्गकल पिनांगला जात होते. ६.२० वाजता या विमानाने उड्डाण केले व १३ मिनिटातच या विमानाचा संपर्क तुटला. यानंतर थेट विमान कोसळल्याचीच माहिती समोर आली आहे. माहिती मिळाल्यानंतर इंडोनेशिया प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली. या विमानात क्रू मेंबर्ससहित  १८८ प्रवासी प्रवास करत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1056750528238100481

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)