१५ सप्टेंबरच्या ‘भूकंपा’नंतरची १० वर्षे (भाग-१)

त्या घटनेला आता १० वर्षे होतील. हा हा म्हणता १० वर्षे गेली असेच म्हणायला हवे. माझ्या ऑफिसच्या नुतनीकरणाचे काम नुकतेच चालू झाले होते. माझ्या खुर्चीला पाठमोरे असलेले एक मोठे पार्टिशन आहे. ते लाकडाऐवजी काचेचे करावे आणि त्यावर सेन्सेक्सचा पहिल्या दिवसापासूनचा आलेख कोरावा, अशी एक भन्नाट कल्पना आम्हाला सूचली.

आम्ही या व अन्य गोष्टींवर काम करीत होतो मात्र काहीबाही कारणाने काम बरेच रेंगाळत गेले. दरम्यान एक मोठा आर्थिक भूकंप झाला. १५ सप्टेंबर २००८. त्यादिवशी अमेरिकेतील सर्वांधिक बलाढ्य वित्त संस्थापैकी एक आणि दीडशे वर्षांपेक्षा जुनी अशी लेहमन ब्रदर्सने दिवाळखोरी जाहीर केली आणि एका भयावह कालखंडाची सुरवात झाली.

-Ads-

१५ सप्टेंबरच्या ‘भूकंपा’नंतरची १० वर्षे (भाग-२)

पुढे दिवसागणिक एआयजी, रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंड आणि मेरिल लिंच यांच्यासारखी नामी गिरामी नावांची यादीत भर पडत गेली ज्याने जागतिक अर्थव्यवस्थेत प्रचंड उलथापालथ झाली. ‘सब प्राईम क्रायसिस’या नावाने कुख्यात या आर्थिक संकटामुळे अमेरिकेबरोबरच जवळजवळ सर्वच अर्थव्यवस्थांना जबरदस्त हादरे बसले. इंटरनॅशन मॉनिटरी फंड आणि अनेक देशांच्या मध्यवर्ती बॅंकांनी त्यांच्याजवळील काही हजार कोटी डॉलरओतूनया संकटांतून मार्ग काढण्यासाठी आटापिटा केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)