आशियायी स्पर्धेत हेप्टाथलॉन खेळात सुवर्ण पदक विजेती खेळाडू स्वप्ना बर्मन हिच्यासाठी प्रसिद्ध अदिदास कंपनी शूज तयार करणार आहे. स्वप्नाच्या पायांना १२ बोटे आहेत. त्यामुळे सर्वसाधारण शूज घालून खेळण्यात तिला त्रास होत होता. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI)ने स्वप्नासाठी अदिदास या कंपनीशी करार केला आहे.

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI)च्या नीलम कपूर यांनी सांगितले, स्वप्नाच्या विषयी माहिती कळल्यावर क्रीडा मंत्रालयाकडून आम्हाला आदेश आला होता त्यानंतर आम्ही त्याचा विशेष बंदोबस्त केला. आम्ही अदिदास कंपनीशी संपर्क केला आणि त्यांनी देखील विशेष शूज देण्याचे आश्वासन दिले आहे.

सुवर्णपदक जिंकल्यावर भाहुक झालेल्या स्वप्नाने आपली व्यथा सर्वांसमोर मंडळी होती. १२ बोटे असल्याने तिला खूप त्रास होत असतो आणि त्यासाठी विशेष शूजची गरज आहे. आदिदास आणि साईच्या नवीन करारामुळे सवाना आता विशेष शूज परिधान करून मैदानात उतरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)