११ वर्षापूर्वी लगावले होते युवराजने ६ बॉल मध्ये ६ सिक्स !

तारीख १९ सप्टेंबर २००७ , दिवस – बुधवार या दिवशी दक्षिण आफ्रिकेत डरबन हादरून गेले होते. आजही तो दिवस आठवला तर तोंडावर फक्त एकाच नाव येते. ‘सिक्सर किंग युवराज सिंह’ कारण युवराजने ११ वर्षापूर्वी लागातार ६ सिक्स मारत विक्रम केला होता. भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला ICC T-20 वर्ल्ड कप जिंकला होता.

युवराज सिंगने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्येअकरा वर्षांपूर्वी स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत सहा सिक्स मारले होते. १९ सप्टेंबर २००७ ला भारत आणि इंग्लड आमने-सामने होती. स्कोर होता १६.४ ओव्हर ३ विकेट आणि १५५ रन त्यानंतर झाला चमत्कार!

-Ads-

तेव्हा मैदानात फ्लिंटॉफ ने युवराजला डिवचले. त्यानंतर युवराजने आपल्या फलंदाजीतून फ्लिंटॉफला जबरदस्त उत्तर दिले. मात्र शिकारी बनला तो स्टुअर्ट ब्रॉड. ब्रॉडला ६ बॉल मध्ये लागातार ६ सिक्स मारत युवराजने इंग्लड संघाला सळो पळो करून सोडले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)