१०० टक्के मतदान करून लोकशाही बळकट करू या

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचे प्रतिपादन
सातारा  –
मतदानाचा अधिकारी हा आपल्याला मोठ्या संघर्षाने मिळालेला आहे. याची जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवली पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये 100 टक्के मतदान करुन आपली लोकशाही अधिक बळकट केली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले.

25 जानेवारी या राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल बोलत होत्या. याप्रसंगी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, जावलीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश क्षीरसागर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) शबनम मुजावर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात नवीन नोंदणी झालेल्या मतदारांना मान्यवरांच्या हस्ते बॅचेसचे वाटप तसेच मतदार जागृतीपर आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्‍य स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आदी स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी उपस्थित सर्वांना मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयार आम्ही एक ते दिड वर्षापासून करत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल पुढे म्हणाल्या, मतदानाचा जन्मसिद्ध अधिकार आपल्याला संविधाने दिला आहे. मतदनाच्या दिवशी मतदान करण्यासाठी शासनाकडून सुट्टी देण्यात येते या सुट्टीचा वापर पहिल्यांदा मतदानासाठी करावा. शिक्षक, बीएलओ तसेच अंगणवाडी सेविका यांनी रात्रंदिवस काम करुन 1 लाख 10 हजार नवीन मतदारांची नोंदणी केली आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करुन राज्य निवडणूक आयोगाच्या सचुनेनुसार याही वर्षी 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्यात लोकशाही निवडणूक व सुशासन या विषयी समाजामध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकरी श्‍वेता सिंघल यांनी शेवटी सांगितले.

नव मतदार हा जबाबदार आहे. शासनाच्या मतदान जनजागृती उपक्रमात नव तरुण मोठ्या उत्साहात सहभागी होतील. लोकशाहीच्या बळकटीसाठी जास्ती जास्त नव तरुण मतदान करेल, असा विश्‍वास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त करुन मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. यामुळे 25 जानेवारी हा मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. 9 वा राष्ट्रीय मतदार दिन असून या दिनानिमित्त मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येते.

वंचित ना राहो कोणी हे निवडणूक आयोगाचे घोषवाक्‍य असून या घोषवाक्‍यानूसार एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी वृंदा शिवदे यांनी केले तर तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)