ड़ॉक्‍टरांनी मृत घोषित केलेले अर्भक दफन करताना जिवंत आढळले

नवी दिल्ली, दि. 19-सरकारी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या बेफिकीरीचा एक धक्कादायक नमुना येथील सफदरजंग केंद्रीय हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाला आहे. बदरपूर येथील एका महिलेने सकाळी एका बाळाला जन्म दिला. हे बाळ अपुऱ्या दिवसांचे होते. नर्सेसना बाळ श्‍वासोच्छ्वास करताना न जाणवले नाही. त्यामुळे डॉक्‍टर्स आणि नर्सेसनी बाळाला मृत घोषित केले. मृत बाळ “सील’ करून अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिले, असे बाळाच्या वडिलांनी, रोहित यांनी सांगितले. बाळाचे दफन करत असतानाच रोहितच्या बहिणीला बाळाची हालचाल जाणवली, त्यांनी सील तोडून पाहिले, तर बाळ जिवंत होते, हालचाल करत होते.

ताबडतोब पीसीआर कॉल करून बाळाला अपोलो हॉस्पिटलमध्ये आणि तेथून सफदरजंग येथे हलविण्यात आले.
या घटनेने हादरलेल्या बाळाच्या नातेवाईकंनी पोलीसांकडे तक्रार केली. जिवंत बाळाला मृत ठरवून डॉक्‍टर सील कसे करू शकतात असा त्यांचा प्रश्‍न होता. जर बाळाची हालचाल कोणाच्या लक्षात आली नसती, तर जिवंत बाळाचे दफन झाले असते.

सफदरजंग हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात शासोच्छवास न जाणवणाऱ्या अशा बाळांना मृत घोषित करण्यापूर्वी एक तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येते, असे दुसऱ्या एका डॉक्‍टरांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)