ह्रतिकचा “क्रिश 4′ आता केवळ एका पावलाच्या अंतरावर 

ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश’ सिरीजचा चौथा भाग लवकरच तयार करण्यात येणार आहे. ह्रतिक फक्त एक पाऊल दूर असल्याचे सांगत, त्याने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने ‘क्रिश 4’ची घोषणा केली आहे. हृतिकचे पप्पा राकेश रोशन यांनी हृतिकच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही घोषणा केली आहे. राकेश रोशन यांनी “क्रिश-4’च्या स्क्रीप्ट लेखनाला यापूर्वीच सुरुवात केली आहे. “क्रिश-4’च्या शुटिंगला या वर्षाच्या अखेरीस सुरुवात करायचे असे हृतिकने ठरवले आहे. त्याच्या हातातील सर्व कामे तो या महिन्याभरात पूर्ण करणार आहे. तोपर्यंत “स्क्रीप्ट’पण फायनल होणार आहे.

या चौथ्या भागामध्ये हृतिक हिरो आणि व्हिलन असे दोन्ही लीड रोल साकारणार आहे, असेही समजते आहे. ‘कोई मिल गया’ हा क्रिश सिरीजचा पहिला भाग होता. या चित्रपटाने लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. त्यानंतर ‘क्रिश’ आणि क्रिश-3ची निर्मिती करण्यात आली. ‘क्रिश’ मधून ह्रतिकने ‘सुपरहिरो’ साकारला. या चित्रपटांचीही प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली. क्रिश-4 मध्ये ‘जादू’ आणि क्रिशची पुनर्भेट होणार आहे. त्यामुळे ‘जादू’ला पाहण्यासाठी प्रेक्षकही आतूर आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)