पुणे – देशातील सर्वात मोठी प्रवासी कार निर्यातक आणि दुसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल निर्माता ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडने 2018 मधील जेडीपी सीएसआय अभ्यासामध्ये ह्युंडाई नंबर 1 चे स्थान प्राप्त करून दिल्याबद्दल सर्व ग्राहकांना धन्यवाद दिले आहेत.
याच अनुषंगाने ग्राहकांना जास्तीत जास्त फायदे मिळावे म्हणून दुसऱ्या देशव्यापी फ्लॅगशिप ग्राहक जोडणीचा कार्यक्रम, फ्री कार केअर क्लिनिक दिनांक 21 नोव्हेंबरपासून 27 नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. ईशान्य ह्युंडाईद्वारा त्याचे आंबेगाव, पुणे येथील कार्यशाळा सुविधेचे सिनियर पी.आय. विष्णू पवार, पी.आय. विष्णू ताम्हाणे, पी.आय. सतीश उंब्रे यांच्या हस्ते आंबेगाव येथे उद्घाटन झाले. या एफसीसीसीच्या माध्यमातून सर्व ह्युंडाई ग्राहकांना आकर्षक ऑफर देण्यात येईल तसेच सिटीप्राईड कोथरूड येथे 24 व 25 नोव्हेंबरला एक्सचेंज कार लोन मेळावा आयोजित केला आहे. तरी सर्व ग्राहकांनी या कार्यक्रमातून फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा