होळ आरोग्यकेंद्रात प्रतिजैविकांचा तुडवडा

बारामती तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काळात प्रतिजैविकांचा पुरेसा साठा उपलब्ध नव्हता. मात्र, चालू आठवड्यात जिल्हा परिषदेने औषधांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे हा प्रश्‍न बऱ्यापैकी मिटला असून पुढील आठवड्यापर्यंत उर्वरित प्रतिजैविके पुरेशा प्रमाणात तालुक्‍यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध होतील.
– डॉ. महेश जगताप

ग्रामीण भागातील रुग्णांना बसतोय फटका : दिलेली रक्कम ठरली तुटपुंजी

सोमेश्‍वरनगर – होळ (ता. बारामती) च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या आवश्‍यक प्रतिजैविके (उपलब्ध असली, तरी मागील दोन तीन महिन्यांच्या काळात मात्र, या प्रतिजैविकांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता व त्याचा फटका ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात बसला.

होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत एकूण 17 गावे असून त्यापैकी कोऱ्हाळे खुर्द, वडगाव निंबाळकर, सस्तेवाडी, होळ, करंजे, वाघळवाडी, मुरूम, वाणेवाडी व निंबूत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. या केंद्रात मोठ्या लोकसंख्येची गावे असल्याने बाह्य रुग्णांची संख्या लक्षणीय असते. प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप अशा साथीच्या आजारांचे रुग्ण जास्त असतात. त्यामुळे या आजाराच्या प्रतिजैविकांना जास्त मागणी असते.

होळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिदिन 80 ते 85 बाह्य रुग्णांची तपासणी होते. अंदाजे 30 रुग्णांना प्रत्येकी 15 प्रतिजैविके दिली जातात. अशा प्रकारे दर महिन्याला अंदाजे तीन ते चार हजार गोळ्यांची आवश्‍यकता असते. यामध्ये अमक्‍झॉफेलीन, सिफेलक्‍झीन, सिप्रोप्रोसेसिन अशा गोळ्यांची जास्त गरज असते. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वर्षांची मागणी केली जाते. मात्र, यंदा कमी प्रमाणात गोळ्यांचा पुरवठा केला गेला, त्यामुळे डिसेंबर ते मार्च या काळात प्रतिजैविकांचा मोठा तुडवडा जाणवला. औषधांचा उपलब्धता नसल्याने जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक केंद्राला औषधे खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपये दिले होते. मात्र, एक तर ही रक्कम खूप उशिरा आली व प्रतिजैविके महाग असल्याने ही रक्कम तुटपुंजी ठरली. त्यामुळे होळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने शेजारील केंद्रातून व रुग्ण कल्याण समितीकडून औषधे घेऊन गरज भागवली असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)