“होर्डींग’वरही वाढीव खर्च

पिंपरी – केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स-2019 च्या प्रसिद्धीसाठी होर्डींग्ज लावण्यात आले. त्यासाठी साडेतीन लाखांचा वाढीव खर्च आला असून त्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. प्रत्येक कामात वाढीव खर्च होवू लागल्याने महापालिकेच्या कारभाराभोवती संशयाचे वलय तयार झाले आहे.

आगामी ऑलिम्पिक आणि आशियाई स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने गुणवंत व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि येत्या काळात भारत खेळामध्ये महाशक्ती व्हावा, यासाठी केंद्र शासनातर्फे खेलो इंडिया युथ गेम्स आयोजित करण्यात येतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वर्षाखालील खेळाडूंसाठी खेलो इंडिया युथ गेम्स-2019चे आयोजन करण्यात आले होते. 9 ते 20 जानेवारी दरम्यान झालेली ही द्वितीय स्पर्धा बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडली. या स्पर्धेत ऍथलेटिक्‍स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्‍सिंग, टेनिस, जिमनॅस्टीक, ज्यूदो, शुटींग, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, कुस्ती, बास्केटबॉल, पुैटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल आदी विविध अठरा खेळ खेळले गेले.

या स्पर्धेत सुमारे दहा हजार खेळाडू, तांत्रिक अधिकारी आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते. या स्पर्धेची पिंपरी-चिंचवड शहरामध्ये, तसेच महामार्गावर होर्डींग्जद्वारे जाहिरात करण्यात आली. त्यासाठी 40 बाय 20 चौरस फुटांचे 20 होर्डींग्ज लावण्यात आले असून त्यासाठी येणाऱ्या 3 लाख 52 हजार रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आणखी 40 बाय 20 चौरस फुटांचे 10 आणि 20 बाय 20 चौरस फुटाचे 20 होर्डींग्ज लावण्यात आले. या दोन्ही आकाराच्या होर्डींग्जसाठी अनुक्रमे 1 लाख 76 हजार आणि 1 लाख 80 हजार असा 3 लाख 56 हजार रुपये इतका वाढीव खर्च आला आहे.

पर्यावरण जागृतीवर 40 लाखांचा खर्च
पिंपरी – चिंचवड शहरात पर्यावरण विषयक जागृतीसाठी बोर्ड बसविणे, वॉल पेंटींग करणे तसेच इतर आवश्‍यक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. 41 लाख 67 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. या कामांसाठी तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये ओम एंटरप्रायजेस या ठेकेदाराने 5 टक्के कमी म्हणजेच 39 लाख 59 हजार रूपये सुधारीत दर सादर केला. त्यामुळे त्यांची निविदा स्विकृत करण्यात आली. त्यानुसार, या ठेकेदाराला हे काम देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)