होर्डिंग दुर्घटनेचा अहवाल आठवडाभरात

अटकेतीन दोघांना जामीन : समिती करणार चौकशी

पुणे – जुना बाजार परिसरातील शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग दुर्घटनेतील दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांच्या चौकशी अभावी रेल्वे प्रशासनाच्या अहवालाचे काम अपुर्ण होते. मात्र, चार दिवसांपूर्वी या दोघांनाही जामीन मंजूर झाला असून आठवडाभरात दोघांची चौकशी करुन अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

शाहीर अमर शेख चौकात दि.5 ऑक्‍टोबर रोजी होर्डिंग दुर्घटना घडली. यात चार लोकांचा मृत्यू तर, काही लोक गंभीर जखमी झाले. रेल्वेच्या परिसरातील होर्डिंग असून रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच ते पडल्याची टीका सर्व स्तरांतून करण्यात आली. यामुळे घटनेची चौकशी करण्याकरीता रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापली होती. यात मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता ए. के. सिंग, उपमुख्य सुरक्षा अधिकारी शिवकुमार, उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. थॉमस तसेच पुणे विभागातील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी डी. विकास यांचा समावेश होता. चौकशी समितीकडून घटनेसंदर्भातील सर्वांची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, यातील दोन जण अटकेत असल्याने त्यांची चौकशी करण्यास मर्यादा येत होत्या. अखेर चार दिवसांपूर्वी दोघांनाही जामीन मंजूर झाल्याने ते बाहेर आले आहेत. यामुळे येत्या आठवड्याभरात त्यांची चौकशी पूर्ण करुन अहवाल सादर करू, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)