होर्डिंग्ज दुर्घटनेमुळे पिंपरी – चिंचवडवर शोककळा

तिघांचा समावेश 
पिंपरी – पुण्यात होर्डिंग्ज पडल्याने हकनाक चार जणांचा हकनाक बळी गेला. दुर्दैवाची बाब म्हणजे मृतांमधील तिघे हे पिंपरी – चिंचवडचे रहिवासी होते. भीमराव गंगाधर कासार (वय 70, रा. पिंपळे गुरव), शामराव राजाराम धोत्रे (वय 45, देहुरोड) व जावेद निसुद्दीन खान (वय 48, रा. घरकुल, पिंपरी), अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही सामान्य कुटुंबातील होते.

जावेत खान हे लक्ष्मी रोडवरील मेन्य अव्हेन्यू या कपड्यांच्या दालनात कामाला होते. दर शुक्रवारी जावेद जुना बाजार येथील मशिदीमध्ये नमाज पठणासाठी येत असत. शुक्रवारी देखील ते नेहमीप्रमाणे नमाज अदा करून रिक्षातून दुकानात कामावर निघाले होते. त्यानंतर ते जुना बाजारच्या चौकात सिग्नलला थांबले असताना हा अपघात झाला. त्यांच्या मृत्यूमुळे चार मुले आणि पत्नीचा आधार हिरावला आहे. शामराव धोत्रे हे मूळचे देहुरोड येथील रहिवासी होते.

ते देहुरोड येथे रिक्षा चालवत होते. मात्र, 2004 साली त्यांनी देहुरोड सोडले. पुणे येथील जनता वसाहत येथे राहण्यास गेले. ते सध्या सॅमसंग मोबाइल “आउटलेट’मध्ये सेल प्रमोटर म्हणून कामाला होते. त्यांची पत्नी आजारी असल्याने ते आधीच चिंतेत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी ससून रुग्णालयात धाव घेतली. धोत्रे यांचा स्वभाव हा शांत व मनमिळावू होता. तर कासार यांचे पार्थीव अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळगावी नेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)