होर्डिंग्जच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटची सुबुद्धी

पुणे – होर्डिंग दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्‍चरल ऑडिटचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी होर्डिंग मालक आणि महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर कामासाठी तज्ज्ञ सल्लागार समितीची नेमणूक करणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

शहरात 1,886 अधिकृत होर्डिंग्ज असून सुमारे 114 अनधिकृत होर्डिंग्ज असल्याची माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने दिली. गेल्या काही वर्षांत शहरात राजकीय हस्तक्षेपामुळे अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. मुख्यसभेतही यावरून अनेकदा चर्चा झाल्या. यावरील जनहित याचिकांमध्ये न्यायालयाने अनेकदा महापालिकेचे कान टोचले आहेत. अशा स्थितीत पालिकेच्या कारवाईला राजकीय इच्छाशक्तीची साथ मिळत नाही. त्यावरून काही अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रारीही दिल्या आहेत. असे असतानाच होर्डिंग दुर्घटनेमुळे हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

-Ads-

अनेक ठिकाणी धोकादायक होर्डिंग्ज
या दुर्घटनेनंतर महापालिकेने तातडीने परवानगी दिलेल्या 1,886 होर्डिंग्जचे स्ट्रक्‍चरल ऑडिटचा निर्णय घेतला आहे. या होर्डिंग्जला महापालिकेने मान्यता दिली असली, तरी अनेक ठिकाणी ते धोकादायकरित्या उभे असून ते वारा अथवा इतर कारणामुळे कोसळल्यास जीवितहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे स्ट्रक्‍चरल ऑडिटचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनधिकृतवर आजपासूनच हातोडा
अनधिकृत होर्डिंग्जवर शनिवारपासूनच कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने म्हटले आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार, 114 होर्डिंग्ज अनधिकृत असून त्यातील न्यायालयात दावे सुरू असलेले होर्डिंग्ज वगळता इतर सर्व होर्डिंग्ज जमीनदोस्त केले जाणार आहे. याशिवाय, शहरात नव्याने उभारलेल्या होर्डिंग्जचे पुन्हा सर्वेक्षण केले जाणार असून या होर्डिंग्जवरही कारवाई केली जाणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)