होर्डिंगप्रकरणी मिळकत धारकांना नोटीस

कराड, दि. 10 (प्रतिनिधी) -येथील पालिकेने खासगी मिळकतींवर उभारण्यात आलेल्या होर्डिंग प्रकरणी शहरातील 27 मिळकतधारकांना नोटीस बजावली आहे. एक महिन्यात होर्डिंग काढून न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा नोटीसीत देण्यात आला आहे. शहरातील अनेक मिळकतधारकांनी आपल्या इमारतींवर भाडे घेऊन होर्डिंग उभे करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अशा होर्डिंगसाठी पालिकेची कसलीही परवानगी घेतलेली नाही. अशा मिळकतींचा सर्व्हे करून संबंधित मिळकतधारकांना पालिकेने नोटीस बजावली आहे. होर्डिंग काढण्यासाठी त्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्या कालावधीत होर्डिंग न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा नोटीसीत देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)