रहस्यमय आणि भयपट अशा विषयावर आधारित असलेल्या ‘होरा’ या चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. पुण्याचे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि बिल्डर ‘तारका फाउंडेशन’ चे अध्यक्ष आशीष काँटे यांच्या वाढदिवस निमित्ताने, यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मोहन जोशी, खासदार अनिल शिरोळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. होराचे संगीत अनावरण आशीष कांटे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘होरा’ निर्माता राहुल रविंद्र म्हात्रे, त्यांच्याबरोबर राजेश ठाकूर, रवि मनी, दीपक उघाडे, हेरिटेज मनोरंजन सहकार्याने दिग्दर्शक सिद्धांत घरत व मनोज एरुनकर, कार्यकारी निर्माता ललित गणेश अम्बर आणि प्रदीप पाडके आहेत.
या प्रसंगी इंडियन क्रिकेटर शारदुल ठाकूर, अभिनेते रोहन हार्के, अशोक शिंदे, शीतल अहिरराव, मीरा जोशी, सिद्धांत घरत, विशाल मोहिते आणि मुश्ताक खान असे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अभिनेते अशोक शिंदे म्हणाले, होरा हा स्पॅनिश शद्ब आहे. ‘होरा’ म्हणजे ‘वेळ’. एक वाटसरू रात्रीच्या वेळी रस्ता चुकतो आणि एका बंगल्यात मुक्कामासाठी जातो आणि तेथे सुरू होतो. रहस्यमय आणि विचित्र सावल्यांचा खेळ. आणि तो वाट सरू त्या ठिकाणी अडकून पडतो आणि तो अडकतो होराच्या चक्रव्यूहात अशी चित्रपटाची रहस्यमय व थरारक कथा आहे.
हा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित होईल. अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा