होय माझी जीभ घसरली – अमित शहा

दिल्ली  -भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काँग्रेसवर निशाणा साधला होता. मात्र बोलताना त्यांच्याकडून चूक झाली आणि कर्नाटकमधील सिद्धरामय्यांचे सरकार  भ्रष्ट्राचारी आहे असं म्हणण्याऐवजी त्यांनी येडीयुरप्पांचे सरकार भ्रष्ट आहे, असा उल्लेख केला होता. चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान आज त्यांनी आपल्या या चुकीची कबुली देत, “होय माझ्याकडून चूक झाली, माझी जीभ घसरली” असं म्हंटलं आहे. मात्र माझ्याकडून जरी चूक झाली असली, तरी देखील कर्नाटकमधील जनतेकडून चूक होणार नाही. ते काँग्रेसला जागा दाखवून देतील असंही त्यांनी म्हंटल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)