होय, ती बदलतेय…

‘आई तू लावतेस ती
गोरी व्हायची क्रीम
मलाही दे ना,

झाले का सुरू तुझे ?,आत्ता
नसते लावायची, चूप बस जा खेळायला!

अग पण मी जरा काळी वाटते
सगळ्या मैत्रिणीच्या मध्ये, त्या किती भाव खातात
सुंदर दिसतात तर,

अरे देवा काय हे करावे
या मुलीला, जाऊदे…’

टिव्ही वरच्या जाहिरातीला भुललेली जुई आईच्या मागेच लागलेली, नकळत्या वयातच मुलींना न्यूनगंडापासून दूर केलं तर नक्कीच त्या आत्मविश्वास कमावतात हे सुज्ञ आईला सांगणे नको, तिच्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे, तीही समर्पक तिला तयार ठेवावी लागतील, त्यासाठी आधी तिचे वाचन,विचारसरणी तिची भूमिका महत्त्वाची असते, त्याच त्या विचित्र, जाचक रूढी परंपरा आणि संस्कार याचा ताळमेळ साधता यायला हवा.

प्याडमॅन यायला बारिच वर्ष जाव लागली ,पाळीच्या जाचातून सुटल्या,तर काही अजून लढतात, तसेच काळ्या गोऱ्याच्या भेदभावात समाज अजूनही अडकलाय हे आपण वधू वर जाहिरातीवरून पाहतोच, आजकाल बराच फरक पडलाय तो केवळ शिक्षणाने, कारण शिक्षणाने त्यावर मात केली आहे, मुलींना आत्मविश्वास निर्माण झाला आहे, त्या स्वतःला ओळखू लागल्या आहेत, विचारी झाल्या, स्वतःवर प्रेम करू लागल्या तरी आज हा प्रश्न आईला विचारला जावा !असेच अनेक भेद मुलामुलींच्या बाबतीत घडतात त्यावर वेळोवेळी लेखकांनी लिहलेल्या केलेल्या चळवळी, लेखनामुळे बरेच बदल सुधारणा होत गेली हे आमचे भाग्य, वंदन या महान स्त्रियांना ज्यांनी आज इथवर आम्हाला आणून सोडले, पुढला वसा हा आपण चालवायचंय, जिद्दीने प्रेमाने संगतीने एकमेकींच्या सहयोगाने.

आधीच गोरी असलेली मुलगी घेऊन तिला काळपट मेकअप करून पुन्हा ऍड मधले फेस वॉश ,क्रिम लावून पुन्हा तिला गोरी दाखवून ऍड करणारे मुलींचे चेहरे गोरे करतील पण ,एक कायम काळ्या गोरीची भेदरेघ कोवळ्या मनावर उमटवत जातील त्याचे काय?आवरा आता तरी, आफ्रिका साऊथ इंडिया केरळ (ज्या नैसर्गिक सावळ्या सुंदर असतात) त्यांना या क्रीम्स चा कसा उपयोग होत असेल .(गोरी सुंदर मुलगी देवाची ,अनुवंशकतेची देण आहे तिचा द्वेष नसावा))मुलांना गोऱ्या मुलीबरोबर लग्न करायचे ही मानसिकता घरातून तयार होते ,ती बदलत आहे तर मग आज पेपर मधील हजारो वधू पाहिजे जाहिराती मध्ये हा हट्ट का?

अजूनही असा हट्ट धरणाऱ्या मुलींनो, मुलांनो बाहेर पडा यातून ,
मन निर्मळ तर तन सुंदर !!

वृषाली वजरीणकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)