होम मिनिस्टरमध्ये शोभना गावडे यांची बाजी

टाकळी हाजी- बाराभाऊ बलुतेदार गणेश मित्र मंडळ टाकळी हाजी आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत शोभना रतन गावडे यांनी बाजी मारत पैठणी मिळवण्याचा मान मिळवला. द्वितीय क्रमांक आशा मोहरे (पैंजण) आणि तृतीय क्रमांक सीमा संतोष घोडे (छल्ला) यांनी मिळवला. या कार्यक्रमाचे नियोजन विनोद बोखारे, धोंडीभाऊ जाधव, सुशांत जाधव, गौरव शेंडे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनिता गावडे, पंचायत समितीच्या सदस्या अरुणा घोडे, पोलीस पाटील शोभा मंदिलकर, रंजना गावडे, अरुणा जाधव यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)