होमिओपॅथीबद्दलचे गैरसमज

 

सर्व प्रकारचे उपचार थकले की, माणूस आपसूक पर्यायी उपचार पद्धतीकडे वळतो आणि या मार्गावर त्याला पहिला पर्याय भेटतो, तो होमिओपॅथीचा. मात्र, या होमिओपॅथीविषयी आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. प्रत्येक उपचार पद्धतीची मूलतत्त्वे अथवा बलस्थाने विचारात न घेता, अनेकदा लोक अर्धवट माहितीच्या आधारे बोलतात, त्यावेळी वैद्यक क्षेत्रात किती जनजागृतीची गरज आहे, ते समजून येते. काळाच्या कसोटीवर टिकलेल्या आणि सर्व गैरसमजांना पुरून उरलेल्या होमिओपॅथीविषयी…

शरीरात आवश्‍यक असणाऱ्या अशा घटकांचा अथवा सत्वांचा अभाव असतो, त्याचा योग्य पुरवठा शरीराला करणे म्हणजे ऍलोपॅथी उपचार होय. होमिओपॅथी पद्धतीत तसे उपचारच नसतात असा समज सर्वत्रच आहे. उदा. रोग्यास रक्‍त देणे, ग्लुकोज, सलाईन देणे, जीवनसत्व देणे इ. ज्या घटकांच्या अभावाने रोगस्थिती अथवा लक्षणे निर्माण झाली आहेत ती त्या घटकांचा योग्य पुरवठा केल्यास निघून जातात व असे करणे म्हणजे कोणत्याही पद्धतीच्या विरुद्ध आहे असे नव्हे; तर शरीर जिवंत व निरोगी ठेवण्यासाठी अन्न खाणे हे जितके स्वाभाविक, नैसर्गिक व आवश्‍यक आहे तितकेच असे उपचार करणे आवश्‍यक आहे.
अतिसाराने ज्याचा शक्तिपात झाला आहे त्यास ग्लुकोज सलाईनसारखे जीवनरसायन देणे आवश्‍यक आहे. अपघातात अथवा अन्य कारणाने ज्याला रक्‍ताचा अभाव झाला आहे त्यास रक्‍त देणे आवश्‍यक आहे. दारिद्य्रामुळे ज्यांना सकस, सत्वयुक्‍त आहारच मिळाला नाही व त्यामुळे पंडुरोग, स्कर्व्ही मुडदूस वगैरेसारखे अभावाचे रोग झाले तर त्यांना योग्य त्या जीवनसत्वाचा ताबडतोब पुरवठा करणेच आवश्‍यक आहे. अंतर्गत औषधामुळे रोगस्थिती सुधारण्यास तसेच स्थिती होऊ न देण्यास प्रतिबंध करणेस मदत होईल. पण प्रत्यक्ष अभाव चटकन भरून काढण्यासाठी योग्य त्या अभावाच्या घटकांचा पुरवठा करणे आवश्‍यक आहे.
होमिओपाथीचे जनक डॉ. हनिमन यांनीही रोगाचे कारण शोधून नष्ट करणेस सांगितले आहे. एवढेच नव्हे तर आणीबाणीचे वेळी ज्यावेळी जीवास धोका असतो अशावेळी इतर पद्धतीचाही वापर करून रोग्याचे प्राण वाचवणेस सांगितले आहे व आणीबाणीची वेळ निघून गेल्यानंतर रोगनिर्मूलनासाठी होमिओपॅथीचा वापर करण्यास सुचविले आहे. हे चिकित्सकांनी नीट समजून घेणे आवश्‍यक आहे. अशा प्रकारचे उपचार होमिओपॅथित नसतात ते फक्‍त ऍलोपॅथितच असता असा समज होण्याला काही कारणे आहेत.
यापैकी एक कारण असे आहे की, होमिओपॅथीचा वापर प्रामुख्याने बिगर वैद्यकीय लोकच अधिक करत असतात. त्यामुळे लक्षणानुसार गोळ्या देण्यापलीकडे त्यांना काही करता येत नसे. शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले डॉक्‍टरच फक्‍त जीवनसत्वे व इतर सहाय्यक उपचार करू शकतात. त्यामुळे होमिओपॅथीत फक्‍त गोळ्या देण्यापलीकडे काही माहीत नसते व त्यास इतर प्रशिक्षित डॉक्‍टरप्रमाणे काही वैद्यकीय तांत्रिक ज्ञान नसते असा साहजिकच समज आहे. दुसरे कारण असे की, अभावाच्या रोगाचे वर वर्णन केलेले उपचार प्रशिक्षित ऍलोपॅथिक डॉक्‍टरच प्रामुख्याने आज शेकडो वर्षे करत आले आहेत. त्यामुळे असे उपचार हे ऍलोपॅथिकच आहेत, असा समज होऊन
बसला आहे.
सध्या होमिओपॅथिक महाविद्यालयातून शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले चिकित्सक तयार होत आहेत. त्यांना मूलभूत वैद्यकीय शास्त्रे व आवश्‍यक ते सहाय्यक उपचाराचे ज्ञान मिळते. त्यामुळे इतर चिकित्सकाप्रमाणेच होमिओपॅथीचे प्रशिक्षित चिकित्सक निर्माण झाले आहेत व होत आहेत. त्यांनी योग्य त्या प्रकारे मूलभूत शास्त्रांच्या ज्ञानाचा व योग्य सहाय्यक उपचाराचा वापर होमिओपॅथी व्यवसायात करून रुग्णांना बरे केल्यास होमिओपॅथी व होमिओपॅथी चिकित्सकाबद्दलचे गैरसमज दूर होतील.
होमिओपॅथीने रोग बरा होण्यास विलंब लागतो असा सर्वसामान्य समज आहे, पण तसे काही नाही. काही रोगात तर काही वेळा होमिओपॅथी औषधाचे सेवन होताक्षणीच रुग्णास बरे वाटू लागते. तर अन्य रोगाचेबाबत असे म्हणता येईल की, साध्य रोग होमिओपॅथी कोणत्याही पद्धतीपेक्षा लवकर बरे करू शकतो व असाध्य रोगात औषधाचा दुष्परिणाम न होता होमिओपॅथी अतिउत्कृष्टपणे आराम देऊ शकते.
कोणत्याही रोगात रोग्याला केवळ तात्पुरता आराम देणे असे होमिओपॅथीत तत्त्व नाही. (झरश्रश्रळरींळेप) जे रोग असाध्यच आहेत. अशाच रोगात फक्‍त जास्तीतजास्त आराम देण्याचे तत्त्व होमिओपॅथीस मान्य आहे, पण जे साध्य रोग आहेत. त्यात रोग दाबणे किंवा रोग्यास तात्पुरता आराम वाटेल असे उपचार करणे होमिओपॅथीला मान्य नाहीत. होमिओपॅथीच्या योग्य व शास्त्रशुद्ध उपचाराने रोगनिर्मूलन होते.
होमिओपॅथिक उपचारात समलक्षणी औषधाची योजना केल्याने प्रथमत: रोगलक्षणे थोडीशी वाढल्यासारखी वाटतात व नंतर नष्ट होतात याशिवाय दुसरीही महत्त्वाची क्रिया होमिओपॅथिक औषधाने होते ती म्हणजेच जुना व मिश्र रोग असेल तर पूर्वी जे रोग लक्षणे दबली असतील ती क्रमश: हेरिंगच्या रोगमुक्‍ती नियमानुसार पुन्हा उद्‌भतात व नष्ट होतात. औषधांच्या क्रिया प्रकरणात याचा यापूर्वी आपण विचार केला आहेच. जुन्या रोगाचा रुग्ण शेवटी लक्षणासाठी चिकित्सकाकडे येतो ते त्याचे लक्षण अथवा रोगस्थिती समलक्षणी औषधाने नष्ट होते, पण त्यानंतर योग्य औषधाने डॉ. हेरिंगच्या रोग निर्मूलनाचे नियमाने रोगनिर्मूलन होत असताना जुने बदलेले विकार उद्‌भवतात व त्याचा रुग्णास त्रास होऊ लागतो. अर्थात ही जुनी उद्‌भवलेली लक्षणे अथवा विकार क्रमश: नष्ट होतात. त्यासाठी जरुरीप्रमाणे समलक्षणी औषधांची योजनाही करावी लागते. रोगनिर्मूलन खऱ्या अर्थाने व शास्त्रशुद्धपणे होत आहे हे जर रोग्यास समजावून सांगितले नाही किंवा त्यास ते पटलेच नाही तर तो रुग्ण संपूर्ण शास्त्राला तसेच होमिओ चिकित्सकाला दोष देऊन उपचार सोडून जातो. त्याचा व इतरांचाही असा समज होतो की, होमिओपॅथीने रोग तर बरा झाला नाहीच उलट जास्तच झाला. गेल्या दोनशे वर्षांत आता सिद्ध झालेली बाब आहे की, होमिओपॅथीने बरे होऊ शकणारे सर्वच रोग पूर्णत: बरे होतात पण रोग निर्मूलन होत असता मुळापासूनच सर्व रोग विकार नष्ट होत असल्याने रोग्याचा समज होतो की, होमिओपॅथीने रोग जास्त होंतो व रोग बरा होण्यास विलंब लागतो, पण हा समज पूर्णत: चुकीचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)