होमगार्डच्या जवानांना 700 रुपये मानधन

गृहविभागाची मान्यता : 40 हजार जणांना फायदा

पुणे – होमगार्डच्या जवानांना न्याय देण्यासाठी त्यांना 700 रुपये मानधन देण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजवाणी करण्यात येणार आहे. यामुळे होमगार्ड जवानांना दिलासा मिळणार आहे. त्याचा लाभ राज्यभरातील तब्बल 40 हजार होमगार्ड जवानांना होणार आहे.

-Ads-

लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी आहे. परिणामी, बंदोबस्तावेळी पोलीसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे बंदोबस्तासाठी होमगार्ड जवानांची मदत घेण्यात येते. या जवानांना दिवसासाठी 400 रुपये मानधन देण्यात येत आहे. ज्या दिवशी बंदोबस्ताचे काम असेल त्या दिवसाचेच मानधन त्यांना मिळत होते. त्यामध्ये आहार भत्त्याचाही समावेश होता.

मात्र, हे मानधन परवडत नसल्याने आणि ते मिळण्यासाठी तीन ते चार महिने वाट पाहवी लागत असल्याने ते वाढवून मिळावे, असा प्रस्ताव राज्यातील होमगार्डच्या प्रत्येक विभागाने राज्याच्या गृह विभागाला दिला होता. गेल्या काही वर्षांपासून यावर गृह विभागाच्या वतीने विचार करण्यात येत होता. अखेर प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात होमगार्डचे शहर समादेशक उत्तमराव साळवी म्हणाले, “मानधन वाढीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. या मानधनात वाढ झाल्यास त्याचा फायदा सर्व होमगार्डच्या जवानांना होणार आहे.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
2 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)