होमगार्डची सात हजार पदे राज्यात भरण्यात येणार

पुणे – पोलिसांच्या कामाचा ताण कमी व्हावा आणि राज्यभरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांच्या दिमतीला अधिकचे होमगार्ड देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यासाठी राज्यात होमगार्डची तब्बल सात हजार पदे भरण्यात येणार आहेत. येत्या जानेवारी महिन्यापासून होणारी ही भरती टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे होमगार्डला शिस्त लागावी यासाठी यावेळी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरीकरणातही मोठी वाढ झाली आहे. हे वास्तव असतानाच वाढत्या औद्योगिकीकरणामुळे गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न उभा ठाकला आहे. त्यातच पोलिसांची संख्या खूपच अपुरी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. तरीही त्यावरील आर्थिक भार राज्य शासनाला न परवडणारा आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यावर पर्याय म्हणून भरती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने राज्यभरात ही पदे भरण्यात येणार आहेत. अशी माहिती होमगार्डचे शहर समादेशक उत्तमराव साळवी यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही पोलिसांच्या प्रमाणेच होमगार्ड दलाचीही तेवढीच जबाबदारी आहे. त्यामुळेच बंदोबस्त आणि आपत्तीच्या प्रसंगी होमगार्ड दलाचे पोलिसांना नेहमीच सहकार्य राहिले आहे, असे स्पष्ट करून साळवी म्हणाले, तुलनेत सध्याची होमगार्डची संख्या खूपच अपुरी आहे. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा निश्‍चितपणे स्वागतार्ह असाच आहे. मात्र, या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी होण्याची आवश्‍यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)