हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्‌स यांचे निधन

फ्लोरिडा – हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते बर्ट रेनॉल्ड्‌स यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. बर्ट रेनॉल्ड्‌स यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या पुतणीने दिले.

हॉलिवूड चित्रपटसृष्टी आणि टीव्ही यामध्ये बर्ट रेनॉल्ड यांची कारकीर्द प्रदीर्घ होती. डॅन ऑगस्ट आणि गन स्मोकसारख्या अनेक टीव्ही मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. “इव्हिनिंग शेड्‌स’ या चित्रपटातली भूमिकेसाठी त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

“वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’या चित्रपटासह इतर काही चित्रपटांमध्ये ते आत्ताही काम करत होते. “अँजल बेबी’ या चित्रपटातून त्यांनी 1961 मध्ये पदार्पण केले होते. “अवर मॅन फ्लिंट’, “व्हाइट लाइटनिंग’, “द मॅन हू लव्ह्ड कॅट डान्सिंग’, “लकी लेडी’ यासारखे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यांना जेम्स बॉन्डच्या भूमिकेसाठीही विचारणा झाली होती. मात्र एक अमेरिकन अभिनेता कधीही जेम्स बॉन्ड साकारू शकत नाही, असे म्हणत त्यांनी ती नाकारली होती.

माझे काका बर्ट रेनॉल्ड्‌स हे एक उत्तम अभिनेते, संवेदनशील माणूस होते. त्यांनी त्यांचे आयुष्य कुटुंब, मित्र, चाहते आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी घालवले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्बेत बिघडली होती. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका येईल आणि त्यांचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते. ज्या चाहत्यांनी त्यांच्यावर मनापासून प्रेम केले त्या सगळ्यांचे मी आभार मानते अशी प्रतिक्रिया त्यांची पुतणी नॅन्सी लीने दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)