हॉलिवूडमध्ये सुपर वुमन साकारायची काजोलची इच्छा

“इन्क्रेडिबल 2′ या हॉलिवूडपटामध्ये काजोलने एका व्यक्तिरेखेला आवाज दिला आहे. बॉलिवूडमध्येही अशाच प्रकारचा रोल साकारायला आपल्याला आवडेल, असे ती म्हणाली. भारतात अद्याप सुपरवुमनवर आधारित सिनेमा बनलेला नाही. जर असा सिनेमा बनला तर खूपच चांगले होईल. आपल्याला स्वतःला असा रोल साकारायला खूप आवडेल, असे ती म्हणाली. मात्र आपली सुपर पॉवर नेमकी काय आहे, हेच आपल्याला माहीत नाही. यासाठी खूप सारे पर्याय आहेत असे ती म्हणाली.

हॉलिवूडमधील संधी स्वीकारायलाही तिची तयारी आहे. त्यासाठी कोणतीही विशेष अटही ती घालणार नाही. केवळ सिनेमाची पटकथा आपल्याला आवडली की आपण सिनेमा स्वीकारू. हिंदी सिनेमांच्या निवडीसाठी आपण आतापर्यंत जे निकष लावले आहेत, त्याच निकषांच्या आधारे हॉलिवूडच्याही सिनेमांची निवड करणार असे काजोल म्हणाली. “इनक्रेडिबल 2’च्या डबिंगसाठी जेंव्हा काजोलला विचारले गेले, तेंव्हा तिच्यापेक्षा तिच्या मुलांनाच जास्त आनंद झाला होता. यानिमित्ताने काजोलचा हॉलिवूडशी पहिल्यांदाच संबंध येणार म्हणून ते खुषीत आहेत. आता प्रत्यक्षाअत हॉलिवूडपटात काम मिळाले की त्यांना अधिक आनंद वाटेल.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)