हॉर्न विरहित शहरासाठी जनजागृती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला ध्वनी प्रदूषणातून विशेषतः हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजातून मुक्त करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग, रोटरी क्‍लब ऑफ निगडी, रोट्रॅक्‍ट क्‍लब ऑफ डी. वाय. पाटील, राजा शिवछत्रपती शिवाजी विद्यालय तळवडे यांच्या वतीने हॉर्न नॉट ओके प्लिज उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत शहरातील मुख्य पाच चौकांमध्ये स्वयंसेवकांनी पोस्टर, स्टिकर आणि वाहन चालकांशी संवाद साधून हॉर्न न वाजविण्याबाबत जनजागृती केली.

हॉर्न नॉट ओके प्लिज या उपक्रमाची सुरुवात निगडी मधील लोकमान्य टिळक चौकामध्ये झाली. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर, मोटार वाहन निरीक्षक उदय इंगळे, पोलीस निरीक्षक एन. के. घोगरे, रोटरी क्‍लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, उपाध्यक्ष विजय काळभोर, हरविंदर दुल्लत, विजय रमाणी, साधना काळभोर, भूषण कुलकर्णी, कमलजित दुल्लत आदी उपस्थित होते.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील म्हणाले, वाजविणाऱ्यासह ऐकणाऱ्यासाठी हॉर्न सुद्धा धोकादायक आहे. त्यामुळे हृदयविकार, मानसिक तणाव, नैराश्‍य अशा प्रकारचे गंभीर आजार होत आहेत. तसेच अचानक वाजलेल्या कर्णकर्कश हॉर्नमुळे अपघात सदृश्‍य परिस्थिती निर्माण होते. हॉर्न अतिआवश्‍यक ठिकाणी वाजवावे. त्यासाठी हॉर्नचे महत्त्व आपण ओळखायला हवे. पिंपरी-चिंचवड शहराला हॉर्नमुक्त करण्यासाठी वाहतूक विभाग प्रयत्नशील आहे. यापुढील काळात शहरातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)